काँग्रेस पक्षाच्या बेळगाव विभाग स्तरावरील असंघटित कामगार विभागाची एकदिवसीय कार्यशाळा सोमवारी बेळगाव येथील काँग्रेस भवनात पार पडली.

ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यशाळेत काँग्रेस पक्षाच्या असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मंजुनाथ जी.एस., उपाध्यक्ष दिनकर, सरचिटणीस नागराज, जिल्हाध्यक्ष शशिधर चिक्कोडी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
काँग्रेस पक्षाच्या असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मंजुनाथ जी.एस. यांनी कार्यशाळेला संबोधित केले. काँग्रेस सरकारने राज्यात सर्वांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या असून त्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील कामगारांच्या समस्यांची आपल्याला जाण असून त्या सोडविण्यासाठी कामगार मंत्र्यांचे लक्ष वेधणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आदिजांबव महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या मंजुनाथ जी.एस. आणि जिल्हा अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या विनय नावलगट्टी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी अनंतकुमार ब्याकोडे , मल्लेश चौगले आदींसह 10 जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व ब्लॉक अध्यक्षांचा सहभाग होता.
Recent Comments