मुडा प्रकरणी राज्यपालांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना दिलेल्या नोटिसीच्या विरोधात काँग्रेस नेते दीपक चिंचोरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी धारवाडमध्ये जोरदार निदर्शने केली.
धारवाड शहरातील कडपा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली. राजकीय कारकिर्दीत आजवर कोणताही डाग नसलेल्या, प्रदीर्घ राजकीय अनुभव असलेल्या सिद्धरामय्या यांच्या नावावर काळी शाई मारण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे. राज्यातील भाजप नेतेही मुडा प्रकरणात सिद्धरामय्या यांचे नाव गोवण्याचे काम करत आहेत. केंद्र सरकारच्या बाहुल्याप्रमाणे वागत असलेल्या राज्यपालांनी सिद्धरामय्या यांना नोटीस बजावली आहे.
केंद्रातील भाजप सरकार राजभवनाचा गैरवापर करून राज्याच्या काँग्रेस सरकारवर खापर फोडण्याचे काम करत आहे. केंद्राच्या बाहुल्याप्रमाणे वागत असलेल्या राज्यपालांनी आपल्या कृतीतून तात्काळ माघार घ्यावी. तसे न केल्यास काँग्रेसला राज्यभरात मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू करावा लागेल, असा इशारा आंदोलकांनी दिला.


Recent Comments