धारवाड जिल्ह्यातील रमणकोप्प गावात दुचाकीमध्ये साप आढळल्याचे प्रकार आज घडला आहे. दुचाकीमध्ये आढळून आलेल्या सापामुळे दुचाकीस्वार काहीसा घाबरला मात्र काही वेळानंतर सर्पमित्राच्या साहाय्याने सापाला पकडून सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.
सध्या अनेक ठिकाणी पाऊस पडत असून उबदार जागेच्या शोधात अनेक ठिकाणी साप जाऊन बसल्याचे आढळून येते. धारवाड जिल्ह्यातील रमणकोप्प गावात चक्क दुचाकीमध्ये साप आढळून आल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र तात्काळ सर्पमित्र अडिवेप्पा तळवार यांना पाचारण करून सापाला पकडून सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.


Recent Comments