11 सप्टेंबर रोजी बेळगावात पंचमसाली वकिलांची राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती पंचमसाली पीठाचे बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांनी दिली .
पंचमसाली पीठाचे बसव जयमृत्युंजय स्वामीजी यांनी बेळगाव येथील शेट्टी गल्ली येथील वकील आर.सी.पाटील यांच्या कार्यालयात येऊन बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व वकिलांची पंचमसाली २ आरक्षण लढ्याबाबत प्राथमिक बैठक घेतली.
माध्यमांशी संवाद साधताना स्वामीजी म्हणाले की, ज्या राज्यात 15 लाख लिंगायत पंचमसाली आहेत, त्या राज्यातपंचमसाली 2अ आरक्षणासाठी 3 वर्षांपासून सातत्याने लढा सुरू आहे. पंचमसाली लढ्याचा परिणाम म्हणून अनेकजण आमदार म्हणून निवडून आले आहेत.

सरकारचे डोळे उघडण्यासाठी 11 सप्टेंबर रोजी बेळगाव येथे राज्यस्तरीय पंचमसाली वकिलांची परिषद आयोजित करण्यात आली असून त्याची प्राथमिक बैठक 15 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे.सर्वांनी उपस्थित राहण्याची विनंती वकिलांना केली आहे .
यावेळी वकील आर.के.पाटील, आर.सी.पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments