एपीएमसी पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी बेळगाव येथील सदाशिवनगर येथील आंबेडकर भवन येथे गणेशोत्सव व ईद मिलाद सणानिमित्त शांतता सभा घेतली.
सदाशिवनगर येथील आंबेडकर भवन येथे एपीएमसी पोलीस ठाण्याचे अधिकारी विश्वनाथ कब्बुरी व मंजुनाथ भजंत्री यांच्या नेतृत्वात अनुसूचित जाती-जमातीच्या बांधवांसोबत शांतता बैठक घेऊन , गणेशोत्सव व ईद मिलाद शांततेत साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आणि सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यात आली.
विश्वनाथ कब्बुरी, मंजुनाथ भजंत्री, तसेच सदाशिवनगर व आंबेडकर नगर येथील अनुसूचित जाती-जमातीचे नेते सहभागी झाले होते.


Recent Comments