Dharwad

अल्पवयीन मुस्लिम मुलांकरवी मला संपवण्याचा कट – इस्माईल तमटागार

Share

माझ्या विरोधकांनी अल्पवयीन मुस्लीम मुलाच्या हातून माझी हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप अंजुमन इस्लामचे अध्यक्ष इस्माईल तमटगार यांनी केला आहे.  प्रभावशाली राजकारणी आणि धारवाड अंजुमन संघटनेचे अध्यक्ष असलेल्या इस्माईल तमटगार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

धारवाडच्या अंजुमन संस्थेत इस्माईल तमटगार यांच्यावर 10 हून अधिक अज्ञात व्यक्तींनी हल्ला करण्याचा प्लॅन काल तयार केला होता . मात्र, तमटगार तेथे नसल्याने तरुणांच्या टोळक्याने रात्रीत तमटगार यांच्या घरावर हल्ला केला. सुदैवाने तमटगार घरी नव्हते. ते बंगळुरूमध्ये असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे दिसत आहे. तमटगार यांच्या कुटुंबीयांशी 10 हून अधिक तरुणांनी गैरवर्तन केल्याचे बोलले जात आहे.

या घटनेबाबत धारवाड शहर पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी जमादार गल्ली आणि दरूर गल्ली येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली, दरम्यान त्यांनी तमटगार यांचा भाऊ जमाल यांना फोन करून आयुक्तांनी माहिती घेतली. काँग्रेस नेते इस्माईल तमटगार यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, मला माझ्या जीवाची धोका आहे हे खरे आहे. मी कोणावर आरोप करत नाही. भाजप, काँग्रेस, जेडीएससह सर्वच पक्षांमध्ये विरोधक आहेत.

अंजुमन निवडणुका, आमदार निवडणुका, महापालिकेच्या निवडणुका यामागे एकप्रकारचे राजकारण असते. मला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांनी तपास करून या घडामोडीमागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

याबाबतची सर्व माहिती आम्ही पोलिसांना दिली आहे. इस्माईल तमटगार यांनी सांगितले कि , मद्यधुंद अवस्थेत अल्पवयीन मुलांच्या गटाने हा प्रकार केला आहे . मी त्यांना ओळखत नाही. यापूर्वीही त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणाले की, त्यांनी मुस्लिम मुलाना सुपारी दिली आहे .

Tags: