धारवाड जिल्ह्यातील काँग्रेसचा प्रभावशाली नेता म्हणून ओळखले जाणारे आणि धारवाड अंजुमन संघटनेचे विद्यमान अध्यक्ष असलेल्या इस्माईल तमटगारच्या हत्येचा कट रचलेल्या 10 जणांच्या टोळीचा प्रयत्न फसल्याने , इस्माईल तमटगार यांच्या घरात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
धारवाडच्या लंगोटी जमादार गल्ली आणि धारवाड अंजुमनच्या वसतिगृहाजवळ 10 जणांच्या अज्ञात टोळक्याने इस्माईल तमटगारच्या हत्येचा कट रचला. मात्र इस्माईल तमटगार बंगळुरू येथे असल्याने या टोळक्याला यश आले नाही, रात्री उशिरा त्यांनी घरात घुसून , आम्ही इस्माईलला संपवायला आलो, मात्र आज तो वाचला . कुटुंबातील सदस्य तसेच इस्माईलला धमकावण्यासोबतच त्याच्या भावासह कुटुंबीयांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. शिवाय, या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या इस्माईलच्या भावांनी धारवाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून भाऊ इस्माईलला योग्य संरक्षण देण्याची विनंती केली आहे.


Recent Comments