धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या , कोथळी गावचे आचार्यरत्न श्री 108 देशभूषण महाराज यांच्या आश्रमाच्या हत्तिणीचे हृदयविकाराने निधन झाले .

कुप्पनवाडी शांतीगिरी ट्रस्ट आणि चिक्कोडी तालुक्यातील कोथळी येथील बेडकिहाळ गावातील उषाराणी नावाच्या हत्तीणीचा वयाच्या ५१ व्या वर्षी मृत्यू झाला. या आश्रमात 1971 मध्ये शिमोगा येथून वयाच्या 6 वर्षांचा एक हत्ती आणण्यात आला होता. बेडकिहाळ गावातील संदीप पोलीस पाटील यांच्या शेतात या हत्तिणीचे वास्तव्य होते .
कर्नाटक आणि महाराष्ट्रातील अनेक धार्मिक केंद्रांमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात प्रामुख्याने उषाराणी हत्तीण सहभागी होत असे. बेडकिहाळ येथील श्री कल्याण सिद्धेश्वरचा ऐतिहासिक दसरा उत्सव, दिवाळी आणि धुळवड पालखी सोहळ्यासह जैन समाजाच्या पंचकल्याण महोत्सव कार्यक्रमात सहभाग घेतला.
उषाराणीची ओळख केवळ धार्मिक कार्यक्रमातच नाही तर चित्रपट आणि मालिकांमध्येही होती. स्वामी समर्थ चित्रपट, जाणता राजा महानाट्य, राजर्षी छत्रपती शाहू महाराज या मालिकांमध्ये या हत्तीणीने आपला ठसा उमटवला. श्री भट्टारक पट्टाचार्य स्वामीजी आणि शांतीगिरी ट्रस्टचे माहूत बसू लक्ष्मेश्वर यांच्यासह भक्तांनी हत्तीला अंतिम श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने मृत हत्तीणीला वनविभागाच्या वाहनात टाकून कोथळी शांतीगिरी टेकडीवरून बेडकीहाळ सर्कल ते जुन्या बसस्थानकापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली . चिक्कोडी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मृत हत्तिणीचे शवविच्छेदन करून विधीनुसार अंत्यसंस्कार केले.


Recent Comments