समाजात सेवाकार्य करून संस्था वाढल्या पाहिजेत. प्रत्येकाला सेवा करण्याची इच्छा असली पाहिजे. त्याचा लोकांना अधिक फायदा होईल, असे माजी नरसेविका सरला हेरेकर यांनी सांगितले
बसवेश्वर सहकारी बँकेच्या , क्लब रोड वरील बँकेच्या कार्यालयात माजी नगरसेविका सदस्या सरला हेरेकर यांनी , केएलई हॉस्पिटल ब्लड बँकेच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते . माजी नगरसेविका , बसवेश्वर बँकेच्या संचालिका सरला हेरेकर यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. बसवेश्वर सहकारी बँकेचे कर्मचारी व अनेकांनी रक्तदान केले.

यावेळी सरला हेरेकर म्हणाल्या की, बसवेश्वर सहकारी बँकेच्या या शिबिरात रक्तदात्यांनी केएलई रक्तपेढीला रक्तदान केले असून, रक्तदात्यांनी रक्तदान करून गरीब जनतेला मदत करावी, अशी विनंती केली. मोफत आरोग्य तपासणी शिबिरासारखे शिबिरे आयोजित करून डॉक्टरांनी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्यामुळे लोकांना विविध आजारांपासून वाचवण्यास मदत होते, असे त्या म्हणाल्या .
बँकेचे अध्यक्ष रमेश कलसन्नवर , उपाध्यक्ष गिरीश बागी, बीओएमचे अध्यक्ष बाळांना कग्गनगी , प्रकाश बाळेकुंद्री , बसवराज उप्पीन, बसवराज उप्पीन , सरला हेरेकर, दीपा कुडची, सतीश के पाटील, सोमशेखर होंबल, राजू चोन्नद . शंकर वाली व कर्मचारी व मंजुनाथ गड्डी, प्रसाद जिरगे अरविंद जाधव, चंदू हिरेमठ. तसेच डॉक्टर्स उपस्थित होते .


Recent Comments