भाजप आणि जेडीएस युतीच्या म्हैसूर चलो पदयात्रेचा आज समारोप झाला. यावेळी भाजप आणि जेडीएसच्या नेत्यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
मुडा आणि वाल्मिकी घोटाळ्याच्या विरोधात भाजप-जेडीएसने आयोजित केलेल्या ‘म्हैसूर चलो’ पदयात्रेचा समारोप झाला. केंद्रीय मंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यात राजकीय मतभेद असले तरी वैयक्तिक वैर नाही. प्रत्येक गोष्टीला नैतिक उत्तर देण्याची क्षमता आपल्यात आहे. सिद्धरामय्या, मागासवर्गीयांचे मुख्यमंत्री नसून, संपूर्ण राज्याचे मुख्यमंत्री आहेत.. डी के शिवकुमार, यांनी आमचे भविष्य वर्तविण्या ऐवजी धी स्वतःच्या भविष्याचा विचार करावा.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, काँग्रेस जे काही करत आहे ते जनआंदोलन नसून धानांदोलन यात्रा आहे. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यात अंतर्गत वाद आहेत. मुडामधील जमिनी सिद्धरामय्या परत देण्यास तयार आहेत यावरून त्यांनी चोरी केली आहे, हे सिद्ध होते. चोरीला गेलेला माल परत मिळाला नाही तर ते योग्य नाही. कायद्यानुसार शिक्षा झालीच पाहिजे, असे ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा म्हणाले, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या पापाचे घडे भरलेले आहेत . केव्हा काय होईल हे आम्हाला माहित नाही. राज्यातील विकास थांबला आहे. धमक असेल तर विधानसभा बरखास्त करून पुन्हा निवडणुकीला सामोरे या. या निवडणुकीत भाजप १३५ हुन अधिक जागा जिंकेल, हे सूर्य आणि चंद्राइतकेच सत्य आहे, असे ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते आर.अशोक म्हणाले की, राज्यातील काँग्रेस सरकारने प्रामाणिक अधिकारी आणि शेतकऱ्यांना पाच हमीभाव दिले. त्यात आत्महत्या नशिबी, दलितांवर अन्याय नशिबी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना भत्ता देण्यात आला आहे. राज्यात शांतता नांदावी यासाठी राज्यातील दलितविरोधी काँग्रेस सरकार मुक्त करायचे आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र म्हणाले की, भाजप सिद्धरामय्या यांच्या विरोधात नाही तर भ्रष्ट सरकारच्या विरोधात आहे. 6 कोटी जनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारची पाळेमुळे उखडली पाहिजेत.
यावेळी माजी मंत्री सदानंद गौडा, खासदार बसवराज बोम्मई, माजी उपमुख्यमंत्री श्रीरामुलू, यदुवीरा वोडेयार आदी सहभागी झाले होते.


Recent Comments