Mysore

मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी दिली म्हैसूर येथील चामुंडेश्वरीला भेट

Share

म्हैसूर येथील श्री चामुंडेश्वरी देवस्थानात आज मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी भेट देऊन श्री चामुंडेश्वरीचे दर्शन घेतले.

 

श्रावण शनिवारच्या औचित्याने मुख्यमंत्र्यांनी आज म्हैसूर येथील श्री चामुंडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन विशेष पूजा केली. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख – समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत विविध मंत्री, आमदार व इतर अधिकारी देखील उपस्थित होते.

Tags: