Belagavi

बेळगावची स्केटर्स जान्हवी तेंडुलकर राज्य मानांकन स्पर्धेत चमकली

Share

बेळगावची स्केटर जान्हवी तेंडुलकरने राज्य मानांकन स्पर्धेत यश संपादन केले आहे.

कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनद्वारे आयोजित 3री कर्नाटक राज्य रँकिंग चॅम्पियनशिप 2024 , म्हैसूर येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 11 जिल्ह्यांतील 350 हून अधिक स्केटर्स सहभागी झाले होते . बेळगावच्या जान्हवी तेंडुलकरने या स्पर्धेत तीन कांस्यपदके पटकावली .

स्केटर्स जान्हवी तेंडुलकरला स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, मंजुनाथ मंडोलकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकर गौडा आणि विश्वनाथ येळ्ळूरकर यांचे मार्गदर्शन लाभले .

Tags: