कृष्णा नदीत वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आम. लक्ष्मण सवदी यांनी मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
अथणी तालुक्यातील हुलगबाळ येथील बाळू चौहान असे दुर्दैवी मृत शेतकऱ्याचे नाव असून आज या शेतकऱ्याच्या घरी जाऊन आम. लक्ष्मण सवदी यांनी कुटुंबियांचे सांत्वन करत कुटुंबियांना व्यक्तिगत आर्थिक मदत केली. याचप्रमाणे शासनाच्यावतीने पाच लाखांची भरपाई दिली. तसेच शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील घेतली.
पाऊस ओसरल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने कपडे धुण्यासाठी सदर शेतकरी नदीकाठावर गेला होता. मात्र नदीच्या पाण्यात शेतकरी वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्याचा मृतदेह एनडीआरएफ टीमने अथक प्रयत्नानंतर शोधून काढला.
Recent Comments