कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे चिक्कोडी तालुक्यातील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात पाणी शिरले होते . आता हे श्री वीरभद्रेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला पूरस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर पौराणिक पार्श्वभूमी असलेल्या चिक्कोडी तालुक्यातील सुक्षेत्र येडूरच्या श्री वीरभद्रेश्वर मंदिरात पुराचे पाणी शिरले होते .
आता पूर ओसरल्याने श्री वीरभद्रेश्वर मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. काल पुजारी आणि भाविकांनी मंदिराची स्वच्छता करून श्री वीरभद्रेश्वर आणि भद्रकालेश्वरी देवतांच्या दर्शनाची परवानगी दिली.
Recent Comments