Belagavi

आग दुर्घटनेतील मृत युवकाच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी : सिटू संघटनेचे आवाहन

Share

बेळगाव तालुक्यातील नावगे येथील स्नेहम इंटरनॅशनल कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी नुकसान भरपाई, जखमींना चांगले उपचार तसेच योग्य मोबदला मिळावा, या मागण्यांचे निवेदन सीटू संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

आज सिटू संघटनेच्या वतीने छेडलेल्या आंदोलनात उपरोक्त मागण्या करण्यात आल्या असून सदर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले.

यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आंदोलक म्हणाले, आग दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, तसेच आगामी काळात असे अनर्थ घडू नयेत यासाठी सर्व कारखान्यांना खबरदारी घेण्याचे आदेश कामगार अधिकाऱ्यांनी द्यावेत. . कामगारांना सुरक्षित आणि दर्जेदार उपकरणे देण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी सिटूचे जैन खान, जी.व्ही. कुलकर्णी, मंदा नेवगी यांच्यासह अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला.

Tags: