विहिरीत पडलेल्या मोराला विजयपूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी तालुक्यातील अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढून त्याचा जीव बचावला .
बसवनबागेवाडी तालुक्यातील मुक्तिहाळ गावातील इरांना एस तोटद यांच्या शेतातील विहिरीत राष्ट्रीय पक्षी पडल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मोराची सुटका केली. विहिरीत उतरल्यानंतर मोराला दोरीने बांधून वर घेण्यात आले .
संगमेश शिवपुजी, महांतेश ममदापुर, श्रीशैल मूकर्तिहाल , चंद्रगुप्त अंबलनूर, शिवप्पा यांनी हे बचाव कार्य केले . अग्निशमन दलाचे लोकांकडून कौतुक होत आहे.


Recent Comments