बेळगाव तालुक्यातील उचागाव येथे संगोळी रायण्णा यांचा पुतळा बसविण्यात यावा व कन्नड ध्वज फडकविण्यास परवानगी मिळावी या मागणीसाठी करवे शिवराम गौडा गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
बेळगाव तालुक्यातील उचागाव येथे शिवरामगौडा गट आणि करवे आणि कन्नड संघटनांच्या वतीने बेळगावच्या चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करण्यात आले. यादरम्यान कन्नड समर्थक आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना करवे शिवरामगौडा गटाचे जिल्हाध्यक्ष वाजीद हिरेकुडी म्हणाले की, दोन वर्षांपासून उचगाव येथे कन्नड ध्वज फडकवण्यास परवानगी मिळत नाही, उचगाव मधील कन्नडवासीयांना काकती पोलिसांकडून धमकावले जात आहे. ज्याठिकाणी संगोळी रायन्ना यांचा जन्म झाला त्याच ठिकाणी पुतळा उभारण्यासाठी अडथळे आणणारे काही नेते याला पाठिंबा देत आहेत, ही शरमेची बाब आहे.

या आंदोलनात करवे कन्नड सेनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल कुमार, करवे शिवरामगौडा गटाचे वाजीद हिरेकुडी, अनिल दड्डीमनी आणि इतर कन्नड समर्थक सहभागी झाले होते.


Recent Comments