Dharwad

धारवाड जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची दिल्ली क्रीडा विद्यापीठासाठी निवड

Share

धारवाड जिल्ह्यातील तिघांची दिल्ली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी मध्ये कुस्ती गटात निवड झाली आहे. यापैकी हुबळीतील एकाची आणि धारवाडमधील दोघांची निवड झाली आहे. जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया वायुपुत्र स्पोर्ट्स फाउंडेशन, उनकलचे अध्यक्ष संतोष इंचल यांनी व्यक्त केली.

आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, दिल्ली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीसाठी निवड होणे ही सोपी बाब नाही. कर्नाटकातून विविध भागातील फार कमी विद्यार्थी निवडले जातात. यापैकी धारवाड जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड झाली असून, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

उनकल येथील सरोज अशोक चिल्लन्नवरा आणि धारवाडचा राहुल चव्हाण आणि गंगोत्री चव्हाण यांची कुस्ती गटात निवड झाली आहे. सरोज आणि गंगोत्री चव्हाण यांना उनकलच्या वायुपुत्र स्पोर्ट्स फाउंडेशनमध्ये प्रशिक्षण देण्यात येत असून गंगोत्री आणि राहुल सध्या धारवाडमधील युवक सेवा आणि क्रीडा विभागाच्या निवासी शाळेत शिकत आहेत. दिल्ली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारे विद्यार्थी ऑलिम्पिक साठी सज्ज झाले आहेत. याआधीच कुस्तीमध्ये नाव कमावलेल्या धारवाडच्या या तीन प्रतिभावंतांना दिल्ली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी मार्फत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून हि बाब अभिमानास्पद असल्याचे संतोष इंचल म्हणाले.

या पत्रकार परिषदेला अशोक चिल्लन्नवर आणि सुरेश बागम्मनवर आदी उपस्थित होते.

Tags: