अनुसूचित जातीचे कंत्राटदार म्हणून बनावट कागदपत्रे तयार करून ई-प्रोक वेबसाइटद्वारे निविदा सादर करणाऱ्या धारवाड येथील बाळकृष्ण बसवराज चोळचगुड्ड या कंत्राटदाराविरोधात चिक्कोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण पेयजल व स्वच्छता चिक्कोडी उपविभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंगराव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिक्कोडी पीएसआय बसगौडा नेर्लि यांनी ४ ऑगस्ट रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
चिक्कोडी विभागातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत घरांना पाणीपुरवठा करणारे नळ बसविण्यासाठी, रायबाग तालुक्यातील अळगवाडी येथे 29.5 लाख आणि अलखनूर येथे 17.90 लाख निधीसाठी अनुसूचित जातीच्या ठेकेदारांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. यासाठी बाळकृष्ण चोळचगुड्ड यांनी आपण अनुसूचित जातीचे असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.
बेळगाव समाजकल्याण विभागाचे सहसंचालक, चिक्कोडी विभाग ग्रामीण पेयजल पुरवठा व स्वच्छता विभागाचे कार्यकारी अभियंता, रायबाग तालुका पंचायत कार्यालय, रायबाग तहसीलदार यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने दिलेल्या अहवालानुसार, बाळकृष्ण यांनी बनावट कागदपत्रे तयार केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
Recent Comments