Belagavi

कडोली येथील शतायुषी भागण्णा नरोटी यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली गावात वास्तव्यास असणारे १०८ वर्षीय भागण्णा नरोटी यांचे निधन झाले. कडोली गावातील रामनगर गल्ली येथे राहणारे शतायुषी भागण्णा नरोटी यांनी वयाच्या १०८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

कडोलीसह आसपास २२ गावात ज्येष्ठ मार्गदर्शक, कुरबर समाजाचे नेते म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात पाच मुले, तीन मुली असा परिवार असून त्यांच्यावर आज कडोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर यल्लाप्पा कुरुबर व कडोली ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली.

Tags: