ARREST

धाब्यावर दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपीना शिताफीने अटक

Share

दरोडा टाकून फरार झालेल्या सहा आरोपींना जेरबंद करण्यात धारवाडच्या गरग पोलीस ठाण्याचे सीपीआय समीर मुल्ला यांच्या नेतृत्वाखालील पथकाला यश आले आहे.

धारवाड तालुक्यातील होसातेगुरजवळील ग्रीन ढाब्यावर काल रात्री दरोडा टाकणाऱ्या नवीन हनश्याल , संतोष बिडीमठ, अक्षय कोळी, कित्तूर येथील सागर गुंजी आणि विरुपाक्ष एमी, मल्लापूरचा सागर गुंजी यांना अटक करण्यात आली असून अजून एक जण फरार आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून २५ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली एर्टिगा कार जप्त करण्यात आली आहे.

सीपीआय समीर मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय सिद्धराप्पा उन्नद आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी गरग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे

Tags: