Belagavi

‘सर्वोच्च’ न्यायालयाच्या अंतर्गत आरक्षणाच्या आदेशाचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी केले स्वागत

Share

मादिग समाजाच्या वतीने अनुसूचित जातीतील मागासवर्गीयांना अंतर्गत आरक्षण देण्यासाठी सदाशिव आयोग लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी स्वागत केले आहे.

ते आज बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या 30 वर्षांपासून अंतर्गत आरक्षणासाठी सुरु असलेला मादिग समाजाचा लढा जिंकला आहे. मागील भाजप सरकारच्या काळात मुख्यमंत्री असलेले बसवराज बोम्मई, कायदा मंत्री जे.सी. माधुस्वामी आणि इतरांनी विधानसभेत चर्चा करून केंद्राला अंतर्गत आरक्षण देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार आज सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचे मान्य करत मादिग समाजाच्या वतीने भाजप सरकारचे काम केल्याबद्दल आभार मानले.

सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताच राज्यात अंतर्गत आरक्षण लागू करण्याची विनंतीही त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना केली.  यावेळी बसवराज सांगडी, प्रशांत ऐहोळे, बाबू पुजारी, यल्लाप्पा हुदली , यल्लाप्पा कलप्पनवर, बसवराज अरवल्ली यांच्यासह समाज बांधवांचा सहभाग होता.

Tags: