रिद्धी विजनच्या संचालिका दिवंगत निशा छाब्रिया यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
रिद्धी विजनच्या संचालिका दिवंगत निशा छाब्रिया यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त न्यू गर्ल्स हायस्कूल, शहापूर, बेळगाव येथील विद्यार्थिनींना वह्यांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना पूनम गुलबानी यांनी निशा छाब्रिया यांचे स्मरण करून विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याबद्दल सांगितले. निशा छाब्रिया यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले होते . अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्कही भरल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्रिवेणी बागी यांच्यासह न्यू गर्ल्स हायस्कूलचे शिक्षक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या .


Recent Comments