अनेक वर्षांपासून या भागात रस्ते नाहीत किंवा गटारींची सोय नाही. चिखलाच्या साम्राज्यात राहणाऱ्या कणबर्गी नगर मधील रामनगर गल्लीत रस्ते आणि गटारीसारख्या मूलभूत सुविधा पुरवून पुण्य कमवा अशी आर्त हाक कणबर्गी नगरवासीय करत आहेत..

बेळगाव शहरांतर्गत येणाऱ्या कणबर्गी येथील रामनगर परिसरात मूलभूत सुविधांची वाणवा भासत असून पावसाळ्यात या भागात राहणे मुश्किलीचे बनले आहे. एका जागी नीट पाय रोवून उभं राहणंही याठिकाणी कुणाला शक्य नसून मनपा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे येथील रहिवासी सुविधांपासून वंचित आहेत. कर भरूनही योग्य सुविधा न मिळाल्याने येथील रहिवासी पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत. गटारींची सुविधा नसल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पावसाचे पाणी रस्त्यावरच साचल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
Recent Comments