बेळगाव येथील तिसऱ्या रेल्वे गेट उड्डाणपुलावर नियंत्रण सुटलेली कार पलटी झाल्याची घटना काल रविवारी रात्री घडली . सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही .
बेळगावचा तिसरा रेल्वे गेट उड्डाणपूल आज पुन्हा चर्चेत आला आहे. या पुलावर रविवारी रात्री एक कार उलटली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करून तात्काळ वाहतूक बंदी व दुरुस्तीचे काम करण्याचे आदेश दिले. या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन हा पूल शनिवारीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र रविवारी या पुलावर , गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार उलटली.
वाहतूक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून कार बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. जखमीना रुग्णालयात दाखल करण्यात आले.


Recent Comments