Dharwad

घर कोसळून मृत्यू झालेल्या मृताच्या कुटुंबीयांचे मंत्री प्रल्हाद जोशींनी केले सांत्वन

Share

27 जुलै रोजी धारवाड तालुक्यातील व्यंकटापुर गावात घराची भिंत कोसळून मृत झालेल्या यल्लाप्पा हिप्पी यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज भेट दिली, आणि त्यांच्या कुटुंबियांना सांत्वन आणि धीर दिला.

 

व्यंकटपुर गावाला केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी आमदार अमृत देसाई आणि स्थानिक भाजप नेत्यांनी भेट दिली . या घटनेबाबत, मृत यल्लप्पा यांच्या पत्नी तसेच मुलांकडून कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती घेतली आणि त्यांना वैयक्तिकरित्या आर्थिक मदत केली, त्यानंतर त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली की, गेल्या शुक्रवारी बाजूच्या घराची भिंत कोसळल्याने यल्लप्पाचा मृत्यू झाला. ही खूप दुर्दैवी घटना आहे . . मृत यल्लप्पा हा गरीब कुटुंबातील आहे. त्यांना तीन मुले असून, याच घटनेत त्यांची पत्नी व मुले जखमी झाली आहेत. आम्ही सरकारकडून आधीच 5 लाखांची भरपाई दिली आहे, शिवाय विधवा पेन्शन चालू करण्यास सांगितले आहे . . आगामी निवास योजनेबाबत मी अधिकाऱ्यांना यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मी मातीच्या घरांबाबत जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिकारी व ग्रामसमितीने घर कोडाळण्याची दखल घ्यावी, असे ते म्हणाले. याशिवाय संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. येडियुरप्पा यांच्या कार्यकाळात ते प्रत्येक पडलेल्या घरासाठी 5 लाख भरपाई देत होते, परंतु आता 1.25 लाख एनडीआरएफ नुकसान भरपाई आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचे पैसे देऊन राज्य सरकार हात धुवून घेत आहे. भारत सरकार एकूण 2.40 लाख देत आहे. सरकारकडून आणखी 2.50 लाख पैसे देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

Tags: