दर पावसाळ्यात बळ्ळारी नाल्यामुळे लोकांना उद्भवणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी विनंती काँग्रेस नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांनी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे.

बेळगाव शहर आणि बळ्ळारी नाल्यालगतच्या परिसरातील नागरिकांना दर पावसाळ्यात समस्यांचा सामना करावा लागतो. वडगाव येथील येळ्ळूर भागातील लोकांच्या शेतात उगवलेली पिके पाण्यात वाहून गेली आहेत. तसेच बळ्ळारी नाल्याचे पाणी निवासी भागात शिरले आहे. पावसामुळे बळ्ळारी नाल्याची पाण्याची पातळी वाढली आहे. अतिरिक्त पाण्यामुळे येथील लोकांना दरवर्षी सुमारे ३ महिने त्रास सहन करावा लागतो. काँग्रेस नेत्या प्रभावती मास्तमर्डी यांनी बेळगावचे जिल्हा पालकमनातरी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांना , नाल्याचे पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यासाठी पावले उचलण्याची विनंती केली आहे.

जिल्हा पालक मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून लवकरच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे


Recent Comments