रस्त्याच्या मधोमध पडलेला हा खड्डा अपघाताला निमंत्रण देत आहे . बेळगाव मधील अमन नगर, सहाव्या क्रॉस येथील रहिवाशांनी हा खड्डा त्वरित बुजवावा, अशी मागणी केली आहे.
बेळगावच्या अमन नगरचा सहावा क्रॉस ते रझा कॉलनीला जोडणाऱ्या रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला आहे. खड्ड्यांमध्ये नागरिक व वाहनधारक अडकून अपघात होत आहेत.
अंधारात या मार्गाने प्रवास करणारे लोक या खड्ड्याचा अंदाज न घेता पडून जखमी होत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलांना शाळेत घेऊन जाणारी रिक्षा या खड्ड्यात पडून सुमारे तीन मुले जखमी झाली होती. रात्रीच्या वेळी पथदिवे नसल्याने वृद्ध लोकही पडून जखमी होत आहेत. संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी हा खड्डे न बुजवल्यास , जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा स्थानिक जावेद नेगीनहाळ यांनी दिला आहे .
या वेळी मुगुटसाब पटेल, आसिफ, जुबेर, नसीर, तौफीक, अखिल मकानदार आदींचा सहभाग होता.


Recent Comments