“शासकीय कर्मचाऱ्यांच्या एकजुटीने आणि संघटनात्मक प्रयत्नांमुळे आम्हाला सातवा वेतन आयोग मिळण्यात यश आले आहे. येत्या काळात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आम्ही लढा देऊ,’ अशी प्रतिक्रिया राज्याचे सरकारी कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सी.एस. षडाक्षरी म्हणाले .

कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघटना चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा युनिटतर्फे चिक्कोडी शहरातील पद्म मंगल भवन येथे आयोजित दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन करताना ते म्हणाले, “सातवा वेतन आयोग विनाकारण मिळालेला नाही. सरकारी कर्मचारी संघटनेचे प्रयत्न आहेत. त्यासाठी सरकार पैसे देण्यास टाळाटाळ करत असताना कर्मचाऱ्यांनी राज्यभर संघर्ष सुरू केला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सातव्या वेतन आयोगाची योग्य अंमलबजावणी करून आपल्या आश्वासनाचे पालन केले आहे. त्यामुळे 17 ऑगस्ट रोजी बेंगळुरू येथे त्यांच्या या परोपकारानिमित्त एका सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे अध्यक्ष म्हणून मी प्रामाणिकपणे काम केले. कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी या कालावधीत 25 हून अधिक आदेश पारित केले गेले आहेत, जे यापूर्वीच्या कोणत्याही काळात केले गेले नव्हते,” त्यांनी गौरवोद्गार काढले.

प्रमुख पाहुणे म्हणून आलेले चिक्कोडीचे उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्यांनी जिद्दीने काम केल्यास जीवनात यश संपादन करता येते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या हुशार मुलांना आमंत्रित करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे, ज्यामुळे मुलांमध्ये उत्साह निर्माण होतो,”
चिक्कोडीचे डीवायएसपी गोपालकृष्ण गौडा म्हणाले की, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यात यश मिळवले आहे. यापुढेही असोसिएशनचे काम सुरू राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 2022-23, 2023-24 मधील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उच्च गुण मिळविणाऱ्या 600 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

चिक्कोडी चारमूर्ती मठाचे पदना स्वामीजींच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात संघ कार्याध्यक्ष एस.बसवराज, एम.व्ही, उपाध्यक्ष, श्रीनिवास डी., सरचिटणीस मल्लिकार्जुन बेल्लारी, वरिष्ठ उपाध्यक्ष संजू सथरेड्डी, एम.बी.नायक, राज्य परिषद सदस्या नवीना गंगरेड्डी, जिल्हाध्यक्ष बी.ए.कुंभार , असोसिएशनचे सरचिटणीस महादेव गोकर, कोषाध्यक्ष दत्ता कांबळे, एन. बेलगावी, डी.एस. वनतगुडे, , डॉ. अरुण सांगरोळे, रामागौडा पाटील, महांतेश बिरादार , गौडप्पा दड्डी, विश्वनाथ हारुगेरी, आनंदा हंजयागोला, बसवराज मुरगोड, अविनाश होलेप्पागोल, चंद्रा अरभावी , अधिकारी आदी उपस्थित होते .
चिक्कोडी शैक्षणिक जिल्हा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बी.ए.कुंभार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.


Recent Comments