अवयवदानामुळे मृत्यूनंतरचे एखाद्याचे आयुष्य वाचू शकते. अवयव दान करणाऱ्या व्यक्तीमुळे 8 जीव वाचू शकतात अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी व्यक्त केली.
बेळगावमध्ये आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, बेळगाव जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय अवयवदान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी बोलताना मंत्री दिनेश गुंडूराव म्हणाले की, अवयवदानाचा निर्णय घेण्यासाठी प्रेरक व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सन्मान करणे हा शासनाचा मानस आहे. अवयवदानाला प्रोत्साहन देण्याची शपथ घेतली जात आहे. जीवन खूप महत्वाचे आहे. एखाद्याचा जीव वाचवणे म्हणजे कुटुंब वाचवण्यासारखे आहे. एका अवयवदात्या व्यक्तीमुळे 8 जीव वाचू शकतात, असे ते म्हणाले.
बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यावेळी बोलताना म्हणाले की, आजच्या आधुनिक जीवनात माणूस कितीही प्रगत असला तरी तो अवयव बनवू शकत नाही. अवयवदानाचे महत्त्व लक्षात घेऊन अवयवदान केले पाहिजे. वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यासह अवयवदानाबाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर फादर प्रमोद कुमार, कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त डी. रणदीप , संचालक डॉ. जी.एन. श्रीनिवास, सहसंचालक रजनी एम, सरचिटणीस हर्षा गुप्ता, अभियान संचालक नवीन भट्ट, बेळगाव जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी राहुल शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी, काहेरचे कुलगुरू नितीन गंगणे, के एल इ चे उपकुलगुरू व्यंकटेश मोगेर, व्ही.एस.साधुनवर, एस.व्ही. मुन्याळ आदी उपस्थित होते.


Recent Comments