Belagavi

वकिलांच्या कक्षाला गळती : बेळगावच्या वकिलांना मिळत नाही न्याय…

Share

बेळगाव ही राज्याची दुसरी राजधानी आहे. प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांच्या संख्येत बेळगाव न्यायालय राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. बेळगावमध्ये जनतेला न्याय देणाऱ्या वकिलांवर अन्याय होत आहे. न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणात काय चालले आहे? पाहा हा रिपोर्ट.

वकिलांच्याच कक्षालाच लागलीय गळती …बेळगावच्या वकिलांना न्याय मिळत नाही…वकिलांचा कक्ष मूलभूत सुविधांपासून वंचित.. तात्काळ दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा…

बेळगाव ही राज्याची दुसरी राजधानी आहे. राज्यातील सर्वाधिक वकील असलेल्या जिल्ह्यांमध्ये बेळगावचा दुसरा क्रमांक लागतो. मात्र येथील वकील मूलभूत सुविधांपासूनही वंचित आहेत. पावसाळ्यात जून कक्षाच्या छताला गळती लागल्याने ,. छत्री घेऊन काम करण्याची परिस्थिती आहे.

येथील खोल्यांमध्ये पाणी गळत आहे. अनेक ठिकाणी छताचे तुकडे खाली कोसळत आहे. महिला वकिलांच्या दालनातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वच्छतेअभावी वकिलांमध्ये संसर्गजन्य आजार होण्याची भीती आहे. देखभालीअभावी , जुन्या वास्तूचे सौंदर्य लोप पावत आहे आणि जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे .
धारवाड मॉडेलनुसार बेळगावात एक हजार वकील एकाच वेळी बसू शकतील अशी व्यवस्था बेळगावात करावी. नवीन इमारत बांधण्यापूर्वीच सध्याच्या इमारतींची दुरवस्था सुधारावी अन्यथा तीव्र संघर्ष करावा लागेल, असा इशारा बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. एस किवडसणांवर यांनी दिला आहे .

बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय पाटील, शीतल रामशेट्टी, वाय.के. दिवटे आदींचा सहभाग होता.

Tags: