बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावामध्ये घराची भिंत कोसळून एक महीला जखमी झाली असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . घटनेची माहिती मिळताच , मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमीना अर्थसाहाय्य केले .
शनिवारी पहाटेच्या सुमारास बडाल अंकलगी गावातील एका घराची भिंत कोसळली . कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली स्पासडुन पार्वती होड्याप्पा हुदली (31) ही महिला जखमी झाली असून तिच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे . सदर जखमी महिलेला उपचारासाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर याना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने , जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन जखमी महिलेच्या प्रकृतीची विचारपूस केली .तसेच तातडीने आर्थिक मदत देखील केली . यावेळी इन न्यूजशी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले कि , मुसळधार पावसामुळे माझ्या मतदार संघातील दोन पेक्षा जास्त घरे कोसळली आहेत . महसूल अधिकारी , तसेच अभियंत्यांसोबत घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे . आता पुन्हा पाऊस सुरु झाला आहे .
आज सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बडाल अंकलगी गावातील घराची भिंत कोसळून महिला जखमी झाली आहे . जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन मी तिला धीर दिला सरकार त्यांच्या सोबत आहे तसेच हॉस्पिटलचा जो काही खर्च होईल तो सरकार कडून दिला जाईल तसेच वैयक्तिक साहाय्य देखील केल्याचे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले . घर कोसळल्यासंदर्भात शिवानंद यांनी अधिक माहिती दिली . सुदैवाने या घटनेत दिड वर्षांचे मूल सुरक्षितपणे बचावले आहे .


Recent Comments