Belagavi

महापालिकेकडून कॅन्टोन्मेंट परिसरातील घरांचे तातडीने सर्वेक्षण…

Share

बेळगावच्या छावणी परिषदेच्या अखत्यारीतील काही सार्वजनिक जागा व मालमत्ता महापालिकेने ताब्यात घेणार असून, सर्वेक्षण न झाल्यामुळे हस्तांतर प्रक्रियेत अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सर्वेक्षकांना तातडीने कच्चे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

बेळगाव छावणी परिषदेच्या अखत्यारीतील काही सार्वजनिक जागा व मालमत्ता महापालिकेने ताब्यात घेणार असून, सर्वेक्षण न झाल्यामुळे हस्तांतर प्रक्रियेत अडथळे येत आहेत. यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आले होते, मात्र योग्य नकाशा नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. छावणी परिषद आणि महापालिका यांची संयुक्त बैठक होणार असून, त्यादृष्टीने गुरुवारी सायंकाळी बेळगाव महापालिकेत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी छावणी परिषदेच्या अखत्यारीतील जमिनी व घरांचे तातडीने कच्चे सर्वेक्षण करून अहवाल देण्याच्या सूचना सर्वेक्षकांना दिल्या.


महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटे, परिषदेचे सचिव महेश जे. उपस्थित होते .
यासंदर्भात बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगावच्या छावणी परिषदेच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रे महानगर महामंडळात समाविष्ट करण्याबाबत केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केली आहे. याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: