बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी शहरात अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करत मुलीच्या पालकांनी खासगी रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण केल्याची घटना घडली.

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी शहरातील मुथुराज हुगार हा डॉक्टर आहे . ज्याने उपचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे . व्यवसायाने डॉक्टर असलेले मुथुराज हुगार हुक्केरी शहरात सुरक्षा नावाचे होमिओपॅथिक रुग्णालय चालवतात. नावात होमिओपॅथी रुग्णालय असले तरी ॲलोपॅथी उपचारदेत आहे , मुलगी आजारी असल्याने तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात आणले. यावेळी , डॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने मुलीचा लैंगिक छळ केला. उपचारानंतर मुलगी वेदनेने रडत तिच्या पालकांकडे गेली. आई-वडिलांनी चौकशी केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे संतापलेल्या मुलीचे आई-वडील आणि नातेवाईकांनी मुथुराजला बेदम मारहाण केली .
या घटनेबाबत सध्या पालकांनी हुक्केरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


Recent Comments