शक्ती योजनेच्या प्रभावामूळे , अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांनी बस अडवून आंदोलन केले.

उत्तर-पश्चिम परिवहन महामंडळाचे अध्यक्ष राजू कागे यांच्या मतदारसंघात बसच्या समस्येमुळे विद्यार्थी त्रस्त आहेत, अशी परिस्थिती आहे.
अनेक वेळा विनंती करूनही अधिकाऱ्यांनी जादा बसेस सोडल्या नसल्याने विद्यार्थ्यांनी आज अथणीत बस अडवून आंदोलन केले. एकाच बसमध्ये 100 हून अधिक जणांची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये जीव मुठीत धरून शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील चमकेरी बेडरहट्टी अडलट्टी या गावातील 150 हून अधिक विद्यार्थी आहेत . या विध्यार्थ्यांना अथणी शहरात जाण्यासाठी जादा बसेसची व्यवस्था करून विद्यार्थ्यांची सोय करणार का, हे पाहणे बाकी आहे.


Recent Comments