चालत्या बसचा पाटा तुटल्याने , सरकारी बस घरात घुसल्याची घटना घडली आहे. विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील हिरेमुराळ गावात ही घटना घडली . सुदैवाने या घटनेतून प्रवासी बचावले आहेत . बस आपल्याघराच्या दिशेने येत असल्याचे पाहून घरातील नागरिक आणि शेजारी धावत सुटले. बसमधील प्रवाशांना कोणतीही अडचण झाली नाही.
ही बस मुद्देबिहाळ डेपोची होती . आणि मुद्देबिहाळ -नारायणपूर मार्गावर प्रवाशांना घेऊन जात होती . मुद्देबिहाळ पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत ही घटना घडली आहे .


Recent Comments