अनुसूचित जातीतील शीळ्ळीक्यातर समाजातील मुलांना जात प्रमाणपत्र नसल्याने शाळेतून बाहेर काढल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांसह पालकांनीही जिल्हाधिकारी कार्यालय गाठल्याची घटना धारवाड येथे घडली आहे.
धारवाड जिल्ह्यातील हुबळी तालुक्यातील गिरियाल या गावातील शीळ्ळीक्यातर आणि किळ्ळीक्यातर या समाजामध्ये गोंधळ झाला असून या पार्श्वभूमीवर शीळ्ळीक्यातर जातीतील मुलांना जात आणि उत्पन्नाचा दाखला उपलब्ध करून देण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. जात प्रमाणपत्र न दिल्यामुळे गिरियाल सरकारी शाळा व खासगी शाळेत मुलांना प्रवेश दिला जात नाही. याशिवाय शासकीय सुविधांअभावी हताश झालेल्या पालकांनी आपल्या पाल्यांसोबत येऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिकारी दिव्या प्रभू आणि पालक मंत्री संतोष लाड यांच्यासमोर संताप व्यक्त केला. यावेळी संतप्त पालकांमधील एका पालकाने अधिकाऱ्यांसमोर फाईल भिरकावून आपला संताप व्यक्त केला.
हुबळी तहसीलदार शीळ्ळीक्यातर समाजातील कोणालाही जात आणि उत्पन्नाचा दाखला देत नसून काही कुटुंबांना चुकीच्या कागदपत्रांच्या आधारावर जात आणि उत्पन्नाचा दाखला दिल्याचा आरोप पालकांनी केला. यावेळी पालकांच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर पालक मंत्र्यांनी तहसीलदारांकडून सर्वंकष माहिती घेत त्या ठिकाणी ग्रेड ऑफिस बोलावण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय मंत्री संतोष लाड यांनी ही समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या


Recent Comments