EVENT

मानवी तस्करी रोखणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य – न्यायमूर्ती के एस रोटेर.

Share

हुक्केरी येथील वरिष्ठ न्यायमूर्ती के एस रोटेर म्हणाले की, मानवी तस्करी रोखणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असले पाहिजे.

तालुका कायदा सेवा समिती, वकील संघ , महिला कल्याण संस्था बेळगाव , आंतरराष्ट्रीय बापूजी शैक्षणिक संस्था हुक्केरी व विविध शासकीय विभागाच्या वतीने मानव तस्करी विरोधी दिनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी बोलतांना न्यायमूर्ती के एस रोटेर म्हणाले कि , मानव तस्करी हा भारतीय राज्यघटनेतील मोठा गुन्हा आहे . ही तस्करी आपण सर्वांनी थांबवणे गरजेचे आहे. , तरुणांमध्ये कायदेशीर जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारी प्रतिबंधक दक्षता निर्माण करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राचार्य बसव पाटील, श्रीमती सुरेखा पाटील महिला विकास विभाग अधिकारी होलेप्पा एच, पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे, अतिरिक्त शासकीय अधिवक्ता ए.सी. करोशी, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष बी.एम. जिनराळे , सचिव एस.जी.नदाफ, सहसचिव व्ही.एल.गस्ती , अंबरीश बागेवाडी, ए.बी. कुलकर्णी, बी.बी.बागी व महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Tags: