Chikkodi

भीषण रस्ता अपघातात गर्भवती महिलेचा मृत्यू

Share

बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी तालुक्यातील कोगनोळी गावात दुचाकी आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ९ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला.

सुशीला रवींद्र खोत असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती आहे, काल संध्याकाळी मयत सुशीला आपल्या पतीसोबत दुचाकीवरून महाराष्ट्रातील कागल शहरातील रुग्णालयात जात असताना वाटेत ती दुचाकी घसरली . त्याचवेळी एका भरधाव कंटेनरने सुशीला यांच्या चिरडल्याने सुशीलाचा जागीच मृत्यू झाला.

सुशीला यांचे पती आणि दुचाकीवर असलेले दोन वर्षाचे मूल गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags: