Dharwad

कँटर व दुचाकीचा अपघात, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी

Share

कँटर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एक पोलीस हवालदार गंभीर जखमी झाला.

धारवाड पोलीस प्रशिक्षण शाळेत कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार शरनुगौडा पाटील हे नवलगुंद येथून हुबळीच्या दिशेने येत असताना विरुद्ध बाजूने येणाऱ्या एका कँटर वाहनाने शरनुगौडा पाटील यांच्या दुचाकीला धडक दिल्याने शरनुगौडा हे गंभीर जखमी झाले. घटना घडताच स्थानिक वाहनचालकांनी दुचाकीस्वाराची माहिती नवलगुंद पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमी पोलीस कर्मचाऱ्याला रुग्णवाहिकेद्वारे धारवाडच्या एसडीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले .

या संदर्भात धारवाड जिल्हा पोलीस अधीक्षक गोपाळ ब्याकोड यांनी रुग्णालयात भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. याप्रकरणी नवलगुंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: