Bailahongala

तिगडी धरणातील मगर थेट ड्रोन कॅमेऱ्यात कैद

Share

बैलहोंगल तालुक्यातील मलप्रभा नदीच्या पात्रात मगरी दिसू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावातील मलप्रभा नदीचे पात्र मुसळधार पावसाने ओसंडून वाहत आहे . या नदीपात्रात मोठमोठ्या मगरींचे दर्शन झाले आहे.
मलप्रभा नदीची पातळी दिवसेंदिवस वाढत असून ती ओसंडून वाहत आहे. वाहत्या नदीच्या पाण्यात मोठमोठ्या मगरी सहज वावरत असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याकडे संबंधित अधिकारी डोळेझाक करत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. तिगडी धरणात कोणतीही सुचना बसविण्यात आलेली नाही, तिगडी धरणाच्या इमारतीच्या आजूबाजूला अनेक झुडपे वाढली असून, पर्यटकांना धरण पाहण्यासाठी येताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

Tags: