Belagavi

श्री नामदेव महाराजांचा संजीवनी समाधी उत्सव भक्तिभावात

Share

श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७४ वा संजीवनी समाधी उत्सव श्री नामदेव दैवकी संस्थानतर्फे साजरा करण्यात आला.

श्री नामदेव दैवकी संस्थानच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७४ वा संजीवनी समाधी कार्यक्रम रविवार २८ जुलैपासून सुरू झाला. या पार्श्वभूमीवर सकाळी महिलांसाठी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पांडुरंगाच्या विविध आकर्षक रांगोळ्यांनी यावेळी लक्ष वेधून घेतले. त्यानंतर संगीत खुर्चीचा कार्यक्रम झाला. याचप्रमाणे लहान मुलांसाठीही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार, 30 जुलै रोजी काकडआरती, महापूजा, भजन आदी कार्यक्रम होणार आहेत.

हा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी राजू कुमटेकर, अजित कालेकर, कोमल काकडे, गजानन बुलबुले, सचिन पतंगे, वैशाली पिसे, महेश चिकोर्डे, प्रसाद मुसळे, निर्मला पतंगे, अमित खटावकर आदि परिश्रम घेत आहेत.

Tags: