माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी पूरग्रस्त घरांसाठी राज्य सरकारकडे 5 लाख रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
महांतेश कवटगीमठ यांनी चिक्कोडी तालुक्यातील मांजरी, इंगळी यासह नदीकाठच्या विविध गावांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. 2019 मध्ये, बी. एस येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना पुरात घर गामवलेल्या घरांना 5 लाख रुपये आणि घरात पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना 10,000 रुपयांची भरपाई दिली होती. तसेच यावर्षी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या घरांसाठी राज्य सरकारकडून तातडीने 5 लाखांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली.
तत्कालीन मुख्यमंत्री बसवराज बोम्मयी यांनी २०२१ च्या महापुरात बेळगाव जिल्ह्यात रखडलेल्या दहा हजार घरांना मंजुरी दिली होती. पूर नियंत्रणासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात समन्वय समिती स्थापन करावी. या समन्वय समितीमुळे पूर रोखता येईल. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील पुराची परिस्थिती लक्षात आल्यानंतर ही समन्वय समिती कोणत्याही प्रकारे पूर रोखण्यास सक्षम असेल, असे ते म्हणाले. मागील भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेले इंगळी डिगेवाडी पुलाचे कामही अर्धवट अवस्थेत रखडले असून, या संदर्भात राज्य शासनाने या कामासाठी तातडीने अनुदान जाहीर करून काम पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यामुळे इंगळी, मांजरी, येडूर, अंकलीसह विविध गावांना पाणी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चिक्कोडी जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश आप्पाजीगोळ , चिदानंद साखर कारखान्याचे अध्यक्ष अजितराव देसाई, दत्त साखर कारखान्याचे संचालक अमर यादव, शीतल यादव, शशिकांत पाटोळे, अण्णासाहेब पवार, शंकर पवार, मोहन लोकरे, ज्योतिराम यादव, परशुराम दीपतोरे, म्हैसकर, गायकवाड, अण्णासाहेब चौगला, अजित चिगरे, सुनिल पाटोळे, बाबासाहेब दबडे आदी उपस्थित होते.
Recent Comments