Belagavi

डॉ. प्रभाकर कोरे यांच्या वाढदिवसानिमित्त 100 रुग्णांची मोफत अँजिओग्राफी – डॉ. कर्नल एम. दयानंद

Share

केएलईचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या ७७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 100 रुग्णांची मोफत अँजिओग्राफी तर 25 रुग्णांवर होणार अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ. कर्नल एम. दयानंद यांनी दिली.

आज के एल इ सभागृहात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोविड नंतर हृदयविकारामध्ये वाढ होत असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हृदयविकाराचे झटके येत आहेत. कोविडनंतर हृदयविकार सर्वाधिक आढळून येत असून केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त केएलईचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागासलेले आणि शासनाच्या कोणत्याही वैद्यकीय योजनेत समाविष्ट नसलेल्या 100 रुग्णांना मोफत अँजिओग्राफी आणि २५ रुग्णांची अँजिओप्लास्टी करण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. कर्नल एम. दयानंद यांनी दिली.

Tags: