पश्चिम घाट प्रदेशात मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदी ओसंडून वाहत आहे. नवीलूतीर्थ जलाशयातून जादा पाणी सोडल्याने रामदुर्ग शहरातील जुना पूल जलमय झाला आहे . पुलावरील वाहत्या पाण्यातूनच जीव धोक्यात घालून शाळकरी मुले, अन्य माणसे आणि वाहने जात येत आहेत .
घाट प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मलप्रभा नदी दुथडी भरून वाहत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मलप्रभा नदीवर बांधलेल्या नविलुतीर्थ जलाशयातून ५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात पाणी साचले असून , असून रामदुर्ग शहरातील जुना पूल पाण्याखाली गेला आहे. मात्र, त्या ठिकाणी बॅरिकेड्स न लावता तालुका प्रशासनाने डोळेझाक केली आहे. पुलावरील वाहत्या पाण्यातून शाळकरी मुले ,माणसे जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत . मात्र तालुका प्रशासनाने या पुलावर सुरक्षेच्या दृष्टिने कोणतीच खबरदारी न घेतल्याचे दिसून येत आहे .


Recent Comments