बेळगाव शहरातील चव्हाट गल्ली येथे मुसळधार पावसामुळे घर कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बेळगाव शहर व परिसरात मुसळधार पावसामुळे शहरातील चव्हाट गल्लीतील भावू शहापुरकर आणि जयंत शहापुरकर यांची घरे कोसळली आहेत. त्यामुळे दोन कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. रविवारी रात्री झोपेत असताना भिंत कोसळू लागली. त्यामुळे घरातील लोक बाहेर धावले, वेळीच प्रसंगावधान राखल्याने , घरातील लोकांचा जीव वाचला आहे . संबंधित विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी कुटुंबीयांनी केली आहे .


Recent Comments