Athani

सत्ती गावातील श्री बुरानसाब दर्गा पूर्णत: जलमय

Share

अथणी तालुक्यातील सत्ती गावातील श्री बुरानसाब दर्गा पूर्णत: जलमय झाला असून प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने श्री बुरानसाब दर्ग्यात पाणी शिरले आहे. हिंदू-मुस्लिम अध्यात्माचा बिंदू असलेल्या बुरान साब दर्ग्यात आता दर्शन दुर्लभ झाले आहे .

गावाच्या आजूबाजूच्या शेकडो एकर जमिनीत पाणी शिरले असून पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्याशिवाय गावातील सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

Tags: