देवळापूर रोड, बैलहोंगल येथील शारदा गंगय्या मठ (वय 79) यांचे आज निधन झाले.

त्यांच्या अंतिम इच्छेनुसार डॉ.रामण्णा चॅरिटेबल ट्रस्ट बैलहोंगल यांच्या मार्फत केएलई डॉ.प्रभाकर कोरे नेत्रपेढीला त्यांचे दोन डोळे दान करून दोन अंधांच्या आयुष्यात प्रकाश दिला. एसजीव्ही मेडिकल कॉलेज, बैलहोंगलला त्यांचे देहदान करण्यात आले . . ट्रस्टचे सचिव डॉ. महांतेश रामण्णावर यांनी डोळे, त्वचा आणि शरीर दान करणाऱ्या मठ कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मृताच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली असा मोठा आप्तपरिवार आहे.


Recent Comments