DAM

नवलतीर्थ जलाशय भरण्याच्या मार्गावर; 4 दरवाजे खोलून पाण्याचा विसर्ग सुरु

Share

पश्चिम घाटातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील नवलुतीर्थ जलाशय भरण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे .

बेळगाव जिल्ह्यातील स वदत्ती तालुक्यातील मलप्रभा नदीच्या पलीकडे बांधण्यात आलेला, नवलतीर्थ जलाशय २०७९.५० फूट आहे आणि त्यात २०७२ फूट पाणीसाठा झाला आहे. जलाशय भरण्यासाठी सात फूट शिल्लक आहे. मलप्रभा नदीत २० हजार क्युसेक पाण्याची आवक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नवलुतीर्थ जलाशयाचे ४ कस्टर दरवाजे उघडण्यात आले असून १००० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

Tags: