Dharwad

धारवाडच्या व्यंकटपुर गावात घराची भिंत कोसळून मृत्यू झाल्याची घटना… माजी आमदार देसाईनी केली वैयक्तिक आर्थिक मदत

Share

संततधार पावसामुळे शेजारील घराची भिंत कोसळून एका गरीब कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला . घटनास्थळी धारवाड ग्रामीणचे माजी आमदार अमृत देसाई यांनी भेट दिली व वैयक्तिकरित्या पीडित कुटुंबाला थेट आर्थिक मदत केली.

धारवाड तालुक्यातील व्यंकटपुर येथे काल शुक्रवारी 26 जुलै रोजी रात्री उशिरा शेजारच्या घराची भिंत कोसळून झालेल्या घटनेत यल्लप्पा हिप्पी यांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय, याच घटनेत यल्लप्पा यांची पत्नी हनुमव्वा आणि मुलगी यल्लवा गंभीर जखमी झाल्या असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर घटनास्थळी भेट देणाऱ्या माजी ग्रामीण आमदारांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, त्यांनी घराचा कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत देऊन माणुसकी जपली आहे. त्याशिवाय, पीडित कुटुंबाला नुकसानभरपाई देण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.

Tags: